बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

नाशिक | नाशिक येथे सध्या सुरु असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish kuber) यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ ‘Renaissance State’ या पुस्तकामुळे महाराष्टात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचं म्हणत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे.

गिरीश कुबेर (Girish Kuber) यांनी शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनीच केल्याचा उल्लेख या पुस्तकात होता. त्यांनी केलेलं हे लिखाण वादग्रस्त असल्याचं म्हणत सध्या राज्यभर निषेध करण्यात येत आहे. यामुळे प्रकरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदेंची बदनामी केली, असा संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहे. याशिवाय पुस्तकावरही बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –  

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस नाही तर चंद्रकांत दादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही”

टेंशन वाढलं! नवी दिल्लीत Omicron चा पहिला रुग्ण सापडला, भारतातील रुग्णसंख्या 5 वर

“ममता बॅनर्जी आल्या आणि महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More