बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाहीस’; शिल्पा शेट्टी राजवर भडकली

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. राज कुंद्राची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं नाव समोर आल्यानंतर शिल्पा शेट्टीला मोठा धक्का बसला आहे.

शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदविण्यासाठी क्राईम ब्रँचचे अधिकारी राजला घेऊन त्याच्या घरी गेले होते. यावेळी राज आणि शिल्पामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणाविषयी मला काहिही माहीत नव्हतं, असं शिल्पाने आपल्या जबाबात म्हटलं आहे. शिल्पाने रडत रडतच आपला जबाब नोंदवला आहे.

यावेळी शिल्पा राजवर चांगलीच भडकली होती. एवढी सगळी लफडी केलीस पण मला काहिही कळू दिलं नाहीस, असं शिल्पा यावेळी राजला म्हणाली. याप्रकणात शिल्पाचा सक्रिय सहभाग असल्याची कोणतीही माहीती आत्तापर्यंत समोर आली नाही, असं मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राचं नाव समोर आल्यापासून शिल्पाला चांगलाच फटका बसला आहे. तिला अनेक कार्यक्रमांमधील कामे सोडावी लागली आहेत. या प्रकरणामुळे तिची प्रतिमा मलिन झाल्याची तिला खंत आहे.

थोडक्यात बातम्या –

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मोठी बातमी! पूराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी केंद्राकडून 701 कोटींची मदत जाहीर

लोकहित जपणं याचा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही- नारायण राणे

त्वचेच्या सर्व समस्यांसाठी नारळ तेल आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

मोठी बातमी! ‘या’ कारणाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या तारखेत बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More