बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तिचे माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध होते’; राज कुंद्राचा खळबळजनक खुलासा

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीने 2009 साली लंडन येथील प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांच्यासोबत लग्न गाठ बांधली आहे. मात्र राज कुंद्रा यांचं हे दुसरं लग्न आहे. राज कुंद्रा यांची पहिली पत्नी कविता हीने शिल्पा आणि राजवर गंभीर आरोप केले होते. अशातच आता राज कुंद्रा यांनी या आरोपाला उत्तर दिलं आहे.

एका मुलाखतीत कविता हीने शिल्पाने आपल्या संसारात ढवळाढवळा केली असून तिच्या मुळेच कविता आणि राज यांचा घटस्पोट झाला असल्याचं म्हटलं होतं. यावर आता राज यांनी मौन सोडलं आहे. यादरम्यान शिल्पाने आपल्याला गप्प राहण्यास सांगितलं होतं म्हणून मी काही बोलत नव्हतो असं राज यांनी सांगितलं. आपली पहिली पत्नी कविताचे आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध होते, असा खुलासा राज यांनी केला.

युरोपमध्ये राज कुंद्रा त्यांचे आई-वडील, कविता आणि सोबतच बहिण आणि तिचा पती सोबत एकाच घरात राहत होते. यावेळी कविता आणि राज यांच्या बहिणीच्या पतीची जवळीक वाढली होती. भारतात परतल्यानंतर राज यांच्या बहिणीला आपल्या पतीच्या फोनमध्ये कवितासोबत फोटो सापडल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

दरम्यान, याबाबत कविताला विचारल्यानंतर कविता हे खोटं असल्याचं सांगत असे. यामुळेच राज यांनी स्वतः घटस्फोटाची मागणी केली होती. तसेच शिल्पासोबत राज यांची भेट त्यांच्या घटस्फोटानंतर  झाली असल्याचं देखील राज कुद्रा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”

ह्रदयद्रावक! कोल्हापुरातील 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

‘दोन डोस मधील अंतर वाढवू नका, अन्यथा…’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांचा इशारा

विदर्भातील ‘या’ जिल्ह्याने करुन दाखवलं, काहीच दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More