गुवाहाटी | एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारमध्ये बंड करुन महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचे राजकारण हलवून सोडले. एकनाथ शिंदे त्यांचा गट घेऊन वेगळा पक्ष स्थापनार का? अशी चर्चा गेले तीन दिवस रंगत होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करत आमचा तसा कोणताही विचार नाही असे सांगितले. मुख्यमंत्र्यानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत असलेले आघाडी सरकार सो़डून भारतीय जनता पक्षासोबत युती करुन सरकार स्थापन करावे, अशी परतीची अट शिंदेंनी घातली होती.
प्राप्त माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे आपल्या गटाचे पक्षात रुपांतर करु पाहात आहेत. आपल्या गटाचा वेगळा पक्ष करुन त्याला “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असे नाव देण्याचे प्रयत्न करत आहेत. आज सायंकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून याला विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
शिंदे गटाच्या या बंडखोरीला मविआ सरकार कायदेशीर कारवाई करत प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. सर्व आमदारांना अधिकृत पत्रे गेली असून त्यांना सोमवार पर्यंत मुंबईत हजर होण्याची मुदत दिली आहे. शुक्रवारी दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठाकरे आणि शिवसेना हे नाव न घेता जगून दाखवावे असे थेट आव्हानच शिंदे गटाला केले होते. त्यावर आता ह्या नावाने नवीन वाद उफळण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ठरवलेल्या या नावावर खरंच शिक्कामोर्तब होणार का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवीन पक्ष उभा रहाणार का? हे आगामी काळात कळेल.
थोडक्यात बातम्या –
बंडखोर आमदारांच्या कुटुंबांची सुरक्षा काढून घेताच एकनाथ शिंदे कडाडले
शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई, वाचा कारवाईत कोणाकोणाची नावे
योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर
उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत केलं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ नॉट रिचेबल
Comments are closed.