…म्हणून भाजपच्या माजी आमदारानं छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी!

सातारा | जेम्स लेनचं प्रकरण किरकोळ म्हणणाऱ्या भाजपचे माजी आमदार दिलीप येळगांवकरांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नाक घास संपुर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

जेम्स लेनचं प्रकरण किरकोळ आहे, असं वक्तव्य येळगांवकरांनी पत्रकारपरिषदेत केलं होतं. त्या वक्तव्याचा श्रीमंत कोकाटे यांनी निषेध केला असून त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपतींची बदनामी करणारे पुस्तक विदेशी जेम्स लेनला हाताशी धरून भांडारकर मंडळींनी प्रकाशित केले होते. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. तसंच भांडारकर संस्थेवर कारवाई करण्यात आली होती. त्याप्रकरणाला येळगांवकर किरकोळ म्हणतात, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असं कोकटेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून मोदींनी 15 लाखाचं आश्वासन दिलं होतं- नितीन गडकरी

-…त्या शिवाय पोलिसांनी देवीकडे जाऊ नये; संभाजी भिडेंच्या पोलिसांना सूचना

-उदयनराजेच काय सख्खा भाऊही भाजपमध्ये गेला तरीही विरोध करणारच!

-रिक्षाचालकाची मुजोरी; पोलिस महिलेला फरफटत नेलं

-गद्दारांना माफी नाही; उदयनराजेंच्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तासाठी ही लढाई आहे!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या