बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर मग कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?”

मुंबई | दोन दिवसांपुर्वी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. तर कुंभमेळाव्यात 5 दिवसात 1700 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लाखो भाविक हरिद्वारला कुंभमेळाव्यासाठी जमले. त्यातून कोरोनाचा संसर्ग देशभरात झाला आहे. पश्चिम बंगालातील निवडणुकांचे मेळे पंतप्रधान थांबवायला तयार नाहीत, तेथे कुंभमेळाव्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

कोरोनाची आपत्ती केंद्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. पश्चिम बंगालातूनही कोरोनाची भेट घेऊन भाजप कार्यकर्ते आपापल्या राज्यात परत येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या संकटाचे खापर सरकारने चीनवर फोडले. हे सर्व चीनच्या वुहान प्रांतातील मासळी बाजारातून पसरले. त्यामुळे जगाच्या वाताहतीस फक्त चीन आणि चीनच जबाबदार आहे हे सगळय़ांनीच ठरवून टाकले. पण आता चीन कोठे आहे? चीनची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. चीनमधून कोरोना नष्ट झाला की काय ते सांगता येत नाही. पण चीनमधील कोरोनाच्या बातम्या येत नाहीत. भारतातील कोरोनाच्या पहिल्या लाटेस चीन जबाबदार असेलही, पण आज जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे, असंही शिवसेनेनं यात म्हटलं आहे.

संपूर्ण केंद्र सरकार राजकीय आखाड्यात उतरले आहे ते पश्चिम बंगाल जिंकण्यासाठीच. तेथेही ममता बॅनर्जी संपूर्ण केंद्र सरकारशी एकाकी झुंज देताना दिसत आहे. प्रश्न इतकाच आहे, उद्या पश्चिम बंगाल भाजपने जिंकले तरी देशातील कोरोनाचे संकट दूर होणार आहे काय? किंवा पश्चिम बंगालात भाजपचा पराभव झाला तर कोरोनाचे खापरही ममता बॅनर्जींवर फोडून दिल्लीश्वर काखा झटकणार आहेत काय?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान, राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. पण सरकारने मधल्या काळात राजधानी पश्चिम बंगालात हलवली व दिल्लीचा ताबाही कोरोनाने घेतला. एकदा राजधानीच पडल्यावर देश पडायला किती वेळ लागतोय?, असंही त्यांनी शिवसेनेनं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल- अजित पवार

दीपक चहरच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे खेळाडू ढेर; चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

“BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका”

सावधान! कोरोना हवेतून पसरतोय; परिस्थिती आणखी गंभीर होणार

उस्मानाबादेत एकाच वेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More