बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे’; मनसेचा घणाघात

मुंबई | मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वादळी सभेनं राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ माजवली आहे. अशातच आता शिवसेना-मनसे वाद (Shivsena,MNS) रंगललेला दिसत आहे.

आज मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली आहे. मला असं वाटतं की, शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.

काय केलं, कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावं. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

दरम्यान, आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे. मनसेला मी टाईमपास टोळी म्हणायचो, कारण ते टाईमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की, भाजपाची ‘सी’ टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला होता.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! HDFC ने केली अत्यंत महत्त्वाची घोषणा

“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”

विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल

40 दिवसांपासून ना अन्न आहे ना पाणी, युक्रेनियन नागरिकांची बिकट परिस्थिती

14 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना, वाचा आजचे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More