बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

रत्नागिरी | राज्यात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये अंतर्गत धूसपूस पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनंत गिते यांनी मी शरद पवारांना आपला नेता मानत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं नाट्य पहायला मिळालं होतं. त्यातच आता शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

शिवसेना नेते अनंत गिते यांच्या समर्थक म्हणून ओळखले जाणारे दापोली विधानसभा क्षेत्राचे प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठाल आणि युवा सेना तालुका प्रमुख विकास जाधव या चार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच अनंत गीते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता गीतेंच्या समर्थकांनी राजीनामा दिल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही महिन्यांपासून शिवसेने अंतर्गत घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, महाविकास आघाडी मधील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा मागे सुरू होती. पण आता नेत्यांकडून उघड उघड बोललं जात असल्यानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

थोडक्यात बातम्या – 

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

“इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More