बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

ठाणे | शिवसेनेचे माजी महापौर व माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं निधन झालं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज पावणे पाचच्या सुमारास त्यांंची प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत 1992 रोजी अनंत तरे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून आले होते. त्यांनी 31 मार्च 1993 साली प्रथम ठाणे महापालिकेचं महापौरपद भूषवलं होत. त्यावेळी 11 अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने प्रबळ असणाऱ्या व्यक्तीला महापौर पदाची उमेदवारी देणे गरजेचं होतं. त्यावेळी शिवसेनेतून अनंत तरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानंतर त्यांनी 1994 आणि 1995 साली असे सलग तीनवेळा त्यांनी महापौरपद भूषवलं होतं.

1997 साली शिवसेनेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपनेतेपदावर त्यांची वर्णी लागली होती. 2000 साली विधानपरिषदेची आमदारकी त्यांना देण्यात आली होती. तर 2006 साली विधापरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या भास्कर जाधव यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत ठाणे शहर मतदारसंघातून त्यांना डावलून काॅंग्रेस मधून शिवसेनेत आलेले नारायण राणे समर्थक रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले होते.

दरम्यान, अनंत तरे यांनी कोपरी-पाचपांखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अवघ्या 24 तासात मातोश्री वर बोलावून घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी दूर केल्यावर उमेदवारी मागे घेत ते पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले होते.

थोडक्यात बातम्या – 

आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा

धक्कादायक! मुंबईतील हाॅटेलमध्ये खासदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहान अख्तरनं सुनावलं; म्हणाला….

अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही, एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

“मोदी सरकार जनतेचे खिसे रिकामे करुन त्यांच्या मित्रांना मोफत देण्याचं काम करत आहे “

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More