शिवसेना नेते संजय राऊतांना बोलण्यापासून रोखलं; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल
नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांची मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. संजय राऊतांची संपत्ती जप्त केल्याने राज्यातील राजकारण तापलेलं आहे. त्यातच बुधवारी राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, संजय राऊतांना बोलण्यापासून रोखलं गेलं.
केंद्र सरकार कायद्याचा दुरूपयोग करत आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. परंतु, सभापतींनी संजय राऊतांना बोलण्यापासून रोखलं आहे. तसेच संजय राऊत यांचं बोलण रेकॉर्डवर येणार नाही, असं सभापतींनी स्पष्ट केलं आहे. सभापतींना संजय राऊतांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संजय राऊतांनी भाजपवर प्रहार करण सुरूचं ठेवलं होतं.
संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी अगोदरच कल्पना असल्याचं म्हटलं आहे. मला पुर्ण कल्पना होती की, ईडी आणि सीबीआय पाठीमागे लागणार आहे. मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहीलं होतं. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव येत आहे, असे आरोप संजय राऊतांनी केले होते.
दरम्यान, ईडी कारवाई केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला होता. बंदुक लावा, हत्या करा, मी तुमच्या बापाला घाबरत नाही. एक रूपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा पत्नीच्या खात्यावर असेल तर सर्व संपत्ती भाजपला द्यायला तयार आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
भारतात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री; मुंबईत आढळला पहिला रूग्ण
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा सविस्तर
“संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय होती?”, शरद पवारांचा रोखठोक सवाल
“गांधींबद्दल जे काही बोललो त्याचा…”, कालीचरण महाराज पुन्हा बरळले
पवार-मोदी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले…
Comments are closed.