बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, मग राष्ट्रवादीच्या का नाही?”

पुणे | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यावरून आता विरोधी पक्षांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ईडीने अटक केली तरी ते राजीनामा देणार नाही, असं म्हणतात. याचाच अर्थ 1993 च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या गुन्हेगारांचं ते समर्थन करत आहेत. त्यांना पाठबळ देणारे नवाब मलिक कसे बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रयत्न भाजप हाणून पाडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.

मी काही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फुट पाडणार नाही. ते हुशार नेते आहेत. संजय राठोडांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केलं की, शिवसेनेने राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची चौकशी सुरू होताच राजीनामा दिला मग मलिकांचा का नाही?, असा सवाल चंद्रकांत पाटील विचारला आहे.

दरम्यान, शिवसेनेने नेहमीच हिंदूत्वाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. आता ही भूमिका शिवसेना घेणार का?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी केला आहे. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. किमान समान कार्यक्रमात एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत, हे त्यांनी ठरवलं आहे, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

थोडक्यात बातम्या-

“मला धमकी आली तर…”, खासदार संभाजीराजेंचा थेट इशारा

शिवसेना-भाजप युतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

रशिया-युक्रेन युद्धात मोठी उलथापालथ, रशियन मीडियाच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी ! ईडी कोठडीत नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

“सत्ता गेल्यापासून भाजपच्या बुडाला आग लागलीये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More