बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर…’; शिवसेना आमदाराचा गंभीर इशारा

सांगली | राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मात्र तीनही पक्षांमधील अंतर्गत वाद सातत्याने समोर येत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी निधी वाटपावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अशातच शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना इशारा दिला आहे. आम्ही काही मंत्रीपद मागायला आलेलो नाही. ना सत्ता मागायला आलोय. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला त्रास होतोय, असं म्हणत आमदार अनिल बाबर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केलीये.

महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकूण घेतलं पाहिजे. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही, असं अनिल बाबर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांकडून सरकार पडण्याच्या अनेक तारखा दिल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेते सरकार 5 वर्षे टिकेल, असा दावा करताना दिसतात.

थोडक्यात बातम्या- 

गुड न्यूज! यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

‘…म्हणून माझं लग्न होत नाहीये’; कंगनानं स्पष्टच सांगितलं

…म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सोशल मीडियाला रामराम

भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

मंत्रालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More