मुंबई | शिवसेना आमदाराच्या (Shivsena MLA) पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (Rajani Kudalkar) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे कुर्ला विधासभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगेश कुडाळकर हे त्यांच्या कुटुंबासह कुर्ल्यातील (Kurla) नेहरू नगर परिसरात वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रजनी कुडाळकर यांनी त्यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी गळफास घेतला.
रजनी कुडाळकर यांच्या मुलाचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. मुलाच्या निधनाने रजनी खचल्या असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात झाली असून रजनी कुडाळकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपर येथील राजवाडी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. आमदाराच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या-
पोस्टाची भन्नाट योजना; सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात असाल तर आत्ताच गुंतवा पैसे
“राजकारण सोडून हिमालयात जायची संधी कोल्हापूरकरांनी दिली होती, पण…”
“कपड्यांचे रंग बदलून कधीही हिंदुत्त्व येत नाही, ते तर…”
‘… तर आमचेही हात बांधलेले नाहीत’, राज ठाकरेंचा थेट इशारा
“अरं…मला बी तमाशाला बोलवा”, अजितदादांच्या वक्तव्याने एकच हशा पिकला
Comments are closed.