बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहे. यासाठी भाजपकडून आदिवासी नेत्या द्रौपदी मूर्म या उभारल्या आहेत तर विरोधी बाकावर यशवंत सिन्हा बसले आहेत. यासाठी उद्धव ठाकरेंना मूर्म यांना पाठिंबा द्यावा असं पत्र देण्यात आलं आहे. यावरच आज मातोश्रीवर खासदारांची बैठक घेण्यात आली. यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदेसोबत असणारे आमदार शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मूर्म(Draupadi Murm) यांनाच पाठिंबा द्यावा. याकारणाने भाजप-शिवसेनेची चर्चेची दार उघडतील अशी शिवसेनाच्या खासदारांची उद्धव ठाकरेंकडे केली असल्याची माहिती राऊतांनी दिली. तसंच या बैठकीत अनेक 5 खासदार अनुपस्थित होते. याबद्दल बोलताना राऊतांनी प्रत्येकाने आपल्याशी संपर्क करून येणार नसल्याची कारणं सांगितली आहेत, असं ते म्हणाले. मात्र श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी याच काही माहित नसल्याचं ते म्हणालेत.

आजच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. शिवसेनेनं यापूर्वी देखील अनेकदा राजकारणापलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठबळ दिलं आहे. सर्व खासदारांनी याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. पक्ष प्रमुखांचा जो आदेश आहे, तो आदेश सर्व सर्व खासदार आणि आमदारांसाठी बंधनकारक असेल, असंही संजय राऊत माध्यामांशी बोलताना म्हणाले.

शिवसेना ही ठाकरेंची आहे इतर कोणाची नाही त्यामुळे पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम राहिल कोणाला वाटत असेल ते अधिकार नाहित तर ते भ्रमात आहेत. बांगर याच्याबद्दल बोलताना ते असं म्हणाले. बाळासाहेब आमचे गुरू आहेत. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आहे. आता उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत, ते सुद्धा आमच्या गुरूस्थानी आहेत. शिवसेनेचं नेतृत्व जो कोणी करतो, तो आमच्या गुरुस्थानी असतो, असंही पुढे राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या

खुशखबर! 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी; तब्बल इतक्या पदांसाठी भरती

Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

बंडखोर आमदारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणतात…

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More