बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना म्हटलं की मोदी, शहा पण घाबरून रस्ता बदलतात”

दहिसर |शिवसेना म्हटलं की मोदी, शहा घाबरतात. आम्हाला पाहिलं की मोदी शहा रस्ता बदलतात. यांच्या नादी लागू नका म्हणतात. हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेलं आणि दांडा बाहेर काढेल अशी ही शिवसेना आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दहिसरच्या जाहीर मेळाव्यात केला.

आता मी बोललो तर ती अर्वाच्च भाषा होईल. बंडखोरांना एक बाप नाहिये. गुजरातमध्ये 3, गुहावटीत 3 आणि दिल्लीत 3-4 बाप आहेत. यांना 30-35 बाप आहेत. हे अक्करमाशी आहेत, आणि समाजात अक्करमाश्यांना प्रतिष्ठा नाहिये. एका बापाचे असाल तर  शिवसेनेसोबत लढण्याची ताकद असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा, असंही मेळाव्यात ते म्हणाले.

महाराष्ट्र त्यांना तीन भागात करायचा आहे. याला शिवसेना प्राणपणाने विरोध करेल म्हणून त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना 56 वर्षे चिरतरूण आहे. शिवसेनेला मरण नाही. आम्ही विष कितीतरी वेऴा पचवलं आहे. आता तुमच्यावर वेळ आहे विष खाऊन मरण्याची, अशी खोचक टीका त्यांनी केली.

एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. शिवसेना घराघरात-मनामनात आहे. बाळासाहेब लोकांच्या मेंदूत आहेत. ज्याने ठाकरेंशी गद्दारी केली तो संपला. ज्याने बाळासाहेबांचे शाप घेतले तो संपला एवढ लक्षात ठेवा, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं.

थोडक्यात बातम्या 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी अमित शहा मैदानात?, महत्त्वाची माहिती समोर

‘माकडं जशी…’; असदुद्दीन ओवैसींनी आमदारांना सुनावलं

राज्यपाल इज बॅक, भगतसिंह कोश्यारींना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

“काय झाडी.., काय डोंगार.., काय हाटेल….. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का?”

“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More