मुंबई | शनिवारी बीकेसी मैदानामध्ये शिवसेनेची विराट सभा पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजप आणि मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी विरोधकांना घेरलं आहे. देशातील वाढणाऱ्या महागाई उल्लेख मुख्यमंत्र्यांनी भाषणात केला.
सर्व शिवसेना जिल्हाप्रमुखांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना वाढविण्यासाठी जिल्हाप्रमुखांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आहेत. गाव तिथे शिवसेना स्थापन करून गावागावात शिवसेना स्थापन करा, असं उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना सांगितलं आहे.
पुढील 25 वर्षे शिवसेनाचा मुख्यमंत्री राहिल असं काम करा. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक गावामध्ये आणि जिल्ह्यात शिवसेना पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री पद सांभाळत असताना संघटनेच्या सक्षमीकरणाकडे उद्धव ठाकरेंचे विशेष लक्ष आहे.
दरम्यान, आगामी काळात राज्यात महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच आता कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
थोडक्यात बातम्या-
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या…
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“जरी काँग्रेससोबत गेलो असलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही”
‘शेवटी गाढव ते गाढव, आम्ही त्यांना लाथ मारली’; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
“उद्धवजींचं नाव घेतल्याशिवाय या बबली बंटीला प्रसिद्धी मिळत नाही”
Comments are closed.