राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ
मुंबई | राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 6 जागांसाठी राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सहा जागांसाठी चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
राज्यातील बदललेल्या समिकरणांनुसार भाजपचे (BJP) दोन उमेदवार व शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचा (Congress) प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. शिवसेनेने सहाव्या जागेवर दावा केल्यानंतर संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. तर आता भाजपही तिसरा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे.
कोणी कितीही आकडेमोड करा. सहावी जागा शिवसेनाच लढवेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. कोणी कितीही आकडेमोड करावी, आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे आणि जितेंगे, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागली आहे. भ्रष्टाचारातून पैसा आणि त्यातून घोडेबाजार. हे दुष्टचक्र कधी थांबेल? असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी
महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल?
सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे. pic.twitter.com/VOXRKRDzdk— Sanjay Raut (@rautsanjay61) May 18, 2022
थोडक्यात बातम्या-
केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
‘आम्ही चवन्नी छाप, भाडोत्री लोक ठेवणार नाही तर…’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना दणका, उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“राजे… डाव ओळखा, हे पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत”
मोठी बातमी! राजीव गांधींच्या मारेकऱ्याची तब्बल 31 वर्षांनंतर जेलमधून सुटका
Comments are closed.