“शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, महाराष्ट्राच्या भल्यासाठी…”
औरंगाबाद | राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपच्या मैत्रीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. रामदास आठवले गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आपण पुढाकार घेणार असून लवकरच त्यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहोत, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला पाहिजे. शिवसेनेने भाजपसोबत मैत्री केली पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना आरपीआय भाजपसोबत निवडणुका लढवणार असल्याचं म्हटलं आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये आणि मराठवाड्यातील जिल्हा परिषदांबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक ठेवली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक भाजपसोबत युती करूनच लढवणार आहोत. याविषयी भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही काही जागा भाजपकडून मागून घेवू, त्याठिकाणी आरपीआयचे उमेदवार उभे करू, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. शिवसेनेने भविष्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून भूमिका बदलली पाहिजे, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
दिशाच्या आई-वडिलांनी मौन सोडलं, दिशाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर
महाराष्ट्र मास्कफ्री होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
“दिशा सालियन प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार, सर्व पुरावे तयार”
दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली…
Comments are closed.