सातारा | 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची संघटना बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ग्रामपंचायतच्या निवडणुका स्वबळावर निवडून आणून त्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.
साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ठरवलं तर, महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुका लढवल्या जातील, असंही देसाई यांनी स्पष्ट केलं.
देसाई म्हणाले की, “ग्रामपंचायत निवडणूका गावपातळीवरील प्रश्नांवर लढवल्या जातात. पक्षाच्या चिन्हांवरुन लढवल्या जात नाही. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यर्त्यांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त निवडणुका स्वबळावर निवडून आणून त्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामुळं चांगला प्रतिसाद मिळलं.”
शिवसैनिक खंबीर असल्यामुळं नेत्यांनी प्रचारात सहभागी होण्याची गरज नाही. पण एखाद्या ग्रामपंचायतीसाठी कार्यकर्त्यांनी मागणी केल्यास पक्षाचे पदाधिकारी सहभागी होतील, असंही देसाईंनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सुरेश रैना, गुरु रंधावाला मुंबई पोलिसांकडून अटक; रॅपर बादशहाचा पळून जाण्याचा प्रयत्न!
नवीन कोरोना किती धोकादायक आहे?; AIIMSचे संचालक म्हणतात…
पुण्यात पुन्हा दिसला गवा; वनविभागानं नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन
फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार
“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”