बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेचं खरंय, राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं”

मुंबई | 2019 च्या महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेनं आपली भूमिका बदलल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं काॅंग्रेसच्या बाबतीत सकारात्मक वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. यावर आता बाॅलिवूड अभिनेता केआरकेनं आपलं मत मांडलं आहे.

आपण शिवसेनेच्या मताशी 100 टक्के सहमत असून सर्व विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांना 2024 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं, असं केआरके म्हणाला आहे. केआरके आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. सोबतच केआरकेनं ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदासाठी योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

काॅंग्रसेमधील अंतर्गत कलह संपत नाही तरीही शिवसेनेसारख्या महत्वाच्या पक्षानं राहुल गांधी बाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेनेनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवल्यानं देशभर महाविकास आघाडीच्या प्रयोगाची चर्चा झाली होती. महाविकास आघाडीसारखाच प्रयोग करून देशभर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून प्रयत्न चालू आहेत.

दरम्यान, केआरकेच्या वक्तव्यानं बाॅलिवूडमधील कलाकारांचा सुद्धा राहुल गांधीना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधीसोबत झालेल्या भेटीबद्दल सर्व माहिती दिली होती. राहुल गांधी आणि काॅंग्रेसच भाजपला राष्ट्रीय स्तरावर रोखण्यात यशस्वी ठरू शकतो, असंही संजय राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या 

‘लखीमपूर घटनेवर मोदी-शहा गप्प का?’, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

‘बिग बाॅसच्या घरात गेले ही माझी चूक होती, मात्र…’- शिवलीला पाटील

“इतिहास साक्षी आहे, दडपशाही विरोधात सह्याद्री निधड्या छातीने उभा राहिला”

…म्हणून वाढदिवसादिवशी महानायकाने घेतला ‘या’ जाहिरातीतून बाहेर पडण्याचा निर्णय

तालिबान्यांसाठी धोक्याची घंटा! ‘तात्काळ ‘हा’ परिसर खाली करा’; अमेरिकेचा नागरिकांना इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More