पुणे | 26 जानेवारीपासून राज्यातील काही ठिकाणी शिवभोजन थाळीची योजना सुरु करण्यात आली आहे. 10 रुपयाच्या या थाळीला मागणी जास्त आणि पुरवढा कमी अशी स्थिती आहे. कारण पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील शिवभोजन केंद्राबाहेर गर्दी नियंत्रणसाठी पोलिसांना तैनात करावं लागत आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ दुपारी 12 ते 2 या कालावधीतच घेता येणार आहे. शिवाय एका दिवशी 75 ते 125 जणांनाच ही थाळी मिळू शकणार आहे. मात्र, शिवभोजनासाठी इच्छूकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मार्केड यार्डेमधील केंद्राबाहेर लोकांच्या लांबच-लांब रांगा लागत आहेत.
शिवभोजन केंद्र 2 वाजता बंद होणार असल्याने लोकांची घाई झाली होती. अशातच लोकांमध्ये रांगेवरुन वादावादी सुरु झाली होती. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना रांगेचं नियंत्रण करावं लागलं.
दरम्यान, शिवभोजन योजना सुरु होऊन 3-4 दिवसच झाले आहेत. असे असताना या योजनेतील त्रुटी दिसून येत आहेत. त्यामुळे या योजनेची वाटचाल पुढे कशी होते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मी तर आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो- अजित पवार
“काळोखात पाप करू नका, काय असेल ते उजेडात करा”
महत्वाच्या बातम्या-
“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला
‘फुलराणी’ने घेतलं ‘कमळ’ हाती; दिल्ली विधानसभेचा करणार प्रचार
Comments are closed.