बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गुढ उकललं; पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचं गुढ उकललं असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. शिवदीप लांडे यांनी केलेल्या पोस्टमध्ये मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्याचा संपूर्ण तपास एटीएसने पूर्ण केल्याची माहिती दिली आहे.

शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये अतिसंवेदनशील असलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात एटीएसला यश आलं असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर एटीएसच्या सर्व पोलिस कर्मचारी आणि साथीदारांना त्यांनी सलाम केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिवस-रात्र एक करून या प्रकरणाचा तपास आम्ही करत होतो आणि शेवटी त्याचा तपास पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मनसुख हिरेन हत्या प्रकरण ही आपल्या सेवेतील आतापर्यंतची सर्वात जटील केस होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिवदीप लांडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे आता एकच खळबळ माजली आहे. मनसुख हत्या प्रकरणामध्ये नरेश गौर या बुकिसह विनायक शिंदे याला अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांची हत्याच झाली असल्याचं गुढ एटीएसने उकललं आहे. या हत्या प्रकरणाची चौकशी उद्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवली जाणार होती. त्यापूर्वीच एटीएसने त्याचा तपास पूर्ण करून सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत.

अटक केलेल्या आरोपींपैकी विनायक शिंदे हा 2007 मध्ये निलंबित केलेला पोलिस कर्मचारी आहे. नरेश गौरने सचिन वाझेला 5 बेनामी सिम कार्डही दिल्याची माहिती पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. या प्रकरणात विनायक शिंदेला आज सकाळी अटक करण्यात आली असून एटीएसचे पथक सध्या शिंदेच्या घरी अधिक तपासासाठी पोहोचलं आहे.

अति संवेदनशील मनसुख हिरेन मर्डर केस की गुत्थी सुलझी। मैं अपने पूरे ATS पुलिस फ़ोर्स के सभी साथियों को दिल से सैलूट करता…

Posted by Shivdeep Wamanrao Lande on Sunday, March 21, 2021

थोडक्यात बातम्या –

“बरंच काही बोलून काहीही न सांगणं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य”

1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये कोसळणार पाऊस!

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल- RSS

पबजी गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; PUBG Mobile India लवकरच भारतात लाँच होणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More