बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फडकणार भगवा

मुंबई | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी गडासह राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सोलापुरात वीरपत्नीसह हजारो शिवमाता आणि शिवकन्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी चौकातील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांनी बाल शिवबांसाठी पाळणाही हलवला.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची 9 हजार रोपांच्या सहाय्याने भव्य प्रतिमा साकारण्यात आली. या भव्य शिवप्रतिमेतून वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचा संदेश देण्यात आला. राज्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

सरकार डोंबिवलीचा भोपाळ होण्याची वाट बघतंय का?- राजू पाटील

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरसह नाशिकच्या पैलवानांचा इंदोरीकरांना पाठिंबा

महत्वाच्या बातम्या- 

औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का!; भाजपचा ‘हा’ नेता शिवबंधन बांधणार

अबब! पोलीस फौजदारीनं केली 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी

“भाजपचे लोक जसं एखादं वाक्य मुद्दाम बोलतात तसं महाराज बोलत नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More