बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी

मुंबई | आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद अनेकवेळा समोर आले आहेत. आता या पक्षांचे कार्यकर्तेदेखील एकमेकांवर नाराज असल्याचं चित्र आहे. त्याचचं एक उदाहरण डोंबिवली येथे पाहायला मिळालं. डोंबिवलीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरून एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळालंय. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली असून या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय.

डोंबिवलीतील एमआयडीसी भागातील मिलापनगर परिसरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले आणि काम निकृष्ट असल्याचे आरोप केले. यावेळी तेथे उपस्थित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत 4 ते 5 कार्यकर्ते जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी सांगितलं की काम सुरू असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि तेथे उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कामाच्या दर्जाबद्दल विचारू लागले. त्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी याबद्दल महानगरपालिकेला विचारा असं सांगितल. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली, असं पूजा म्हात्रे यांनी सांगितलंं.

तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी हा वाद राजकीय वैमनस्यातून केला असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणाची चौकशी मनपाडा पोलिस स्टेशन मध्ये सुरू आहे. एकीकडे विरोधक आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत तर दुसरीकडे आघाडी सरकारमधील कार्यकर्ते आपआपसातच भांडताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झाली”

रूपालीताई कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असेल त्यामुळे…- चंद्रकांत पाटील

मोठी बातमी! अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना आधी अटक नंतर तत्काळ जामीन

“संजय राऊतांकडे अदृश्य डोळे आहेत, धृतराष्ट्राला जे दिसत नाही ते देखील संजय राऊतांना दिसतं”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More