बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आशिष शेलारांना टिंगलटवाळीशिवाय काही काम उरलं नाही”

मुंबई | आमदार आशिष शेलार यांना सध्या काही काम नाही. संपूर्ण भाजप बेकार आहे. त्यामुळे खिजवणं, चिडवणं, टिंगलटवाळगी करणं एवढंच काम त्यांना उरलं आहे, अशी बोचरी टीका परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे.

ठाकरे सरकारच्या काही निर्णयांवर शेलार यांनी ट्विटरवरून टीका केली होती. यालाच अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या गोष्टी समजत नाहीत त्यावर शेलारांनी बोलू नये, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

पोलिसांची तयारी नसतानाही नाइट लाइफचा निर्णय लादला, आता नुकसान सहन करून मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी ‘म्हातारीचा बुट’ हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं, अशी टिका शेलार यांनी केली होती.

दरम्यान, शेलार काय आणि एकूणच भाजप त्यांच्या डोक्यात ‘नाइट लाइफ’ म्हणजे अय्याशी आहे, ‘नाइट लाइफ’ ही अय्याशी नव्हे. आम्ही दारू, पब, वेश्या व्यवसायासाठी रात्री परवानगी दिलेली नाही, असंही परब यांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं

“साध्वी प्रज्ञा मूर्ख, आमचं दुर्दैव की त्या आमच्या पक्षात आहेत”

महत्वाच्या बातम्या- 

लोकेश राहूलने मोडला किंग कोहलीचा ‘तो’ विक्रम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करणार

केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More