नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?

नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?

मुंबई | नको नको म्हणता म्हणता शिवसेना अखेर भाजपसोबत युती करण्यासाठी तयार झाली आहे. भाजप लोकसभेच्या 25 तर शिवसेना 23 जागा लढवेल आणि हाच अंतिम फॉर्म्युला असेल असं सांगितलं जात आहे. 

युतीसाठी शिवसेनेनं भाजपपुढे काही अटी टाकल्या होत्या. लोकसभेसोबतच विधानसभेचं जागावाटप व्हावं, ही शिवसेनेची मागणी होती. 

भाजपचे विद्यमान खासदार तसेच आमदार असलेल्या काही मतदारसंघांची मागणी देखील शिवसेनेनं केली आहे. लोकसभेच्या जागा सोडायला भाजप तयार नाही, मात्र युतीसाठी विधानसभेच्या काही जागा मात्र भाजप सोडू शकते. 

दरम्यान, विधानसभेच्या जागावाटपाचं सूत्र देखील आत्ताच ठरेल असं कळतंय. मात्र कोणत्या जागांची अदलाबदल करायची ते लोकसभेनंतर ठरवू, अशी भाजपची भूमिका आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाआघाडीचे पंतप्रधान कोण असतील? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ नावं…

आज राष्ट्रवादी आपले सगळे पत्ते उघडे करणार?, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

राहुल गांधीनी साधलं ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य! म्हणतात… नफरत से नही प्यार से जीतेंगे

‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारचं तत्वज्ञान, सोनिया गांधींचा बोचरा वार

‘RSS हा बेलागम घोडा’, प्रकाश आंबेडकरांची मालेगावच्या सभेत ‘RSS’वर सडकून टीका

 

Google+ Linkedin