शिवसेना-भाजप एकत्र लढणार? दोन्ही पक्षात बैठका सुरु?

मुंबई | शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. मात्र भाजपने अजूनही आशा सोडलेली नाही. युतीसाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. 

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर शिवसेनेकडून सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री सुभाष देसाई आणि खासदार अनिल देसाई यांच्यात चर्चा सुरू आहे. ‘नवाकाळ’नं यासंदर्भात वृत्त दिलंय. 

जागा वाटपाबाबत भाजपाने सौम्य भूमिका घेण्याची तयारी दाखवल्याचं कळतंय. दरम्यान, शिवसेना अद्याप तरी स्वबळावर निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून अशा बातम्या पसरवल्या जात आहेत का? याबद्दलही शंका व्यक्ती केली जातेय.