उद्धव ठाकरेंची बहिणीला भाऊबीज, घोटाळेबाज पुस्तिकेत पंकजांचा त्रोटक उल्लेख

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मानलेल्या बहिणीला भाऊबीज भेट दिलीय. ‘घोटाळेबाज भाजप’ या पुस्तिकेत पंकजा मुंडे यांचा त्रोटक उल्लेख आहे.

पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर चिक्की घोटाळा असं लिहिलंय. मात्र या पुस्तिकेत ना इतरांप्रमाणे याची तपशीलवार माहिती आहे ना पंकजा मुंडे यांचं छायाचित्र. त्यामुळे भाजपवर आसूड ओढताना शिवसेनेने पंकजा मुंडेंबाबत पद्धतशीरपणे काळजी घेतल्याचं कळतंय.

बीडमध्ये शिवसेनेची फारशी ताकद नाही. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने पंकजा मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला होता.