भंडारा महाराष्ट्र

‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला

भंडारा | भंडारा येथील रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सामनामधून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसं काम झालं तसं करा, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

भंडाऱ्यात दहा बालकांचा मृत्यू झाला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या दुर्घटनेचे राजकीय भांडवल लगेच सुरू केलं. हा बेशरमपणाचा कळस आहे, अशी टीका संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे.

दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे, असं अग्रलेखात संजय राऊत यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार

“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”

‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

“पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या