महाराष्ट्र मुंबई

“शब्दांच्या फिरवाफिरवीचा अन् बनवाबनविचा आम्हाला वीट आलाय”

मुंबई | जे सत्तास्थापनेचे ठरले होते त्यावर त्यांच्या मुखातून शब्द निघत नाही. पुन्हा ‘असं बोललोच नाही,’ ‘असा शब्द दिलाच नाही’ असे सांगतात. या शब्दांच्या फिरवाफिरवीचा या बनवाबनवीचा आम्हाला वीट आला आहे व जनतेलाही उबग आला आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेशिवाय सरकार बनणार नाही, पण शिवसेनेबरोबर जे ठरले होते त्यावर मागे हटायचे हे कसले राजकारण? असल्या भंपक राजकारणाचा चिखल आम्ही आमच्या अंगास लावून घेऊ इच्छित नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘वर्षा’ बंगल्यावर राहू शकते. ते ‘काळजीवाहू’ या बिरुदावलीने तिथे थांबतील, पण किती दिवस याचा निर्णय राज्यपालांना घ्यावाच लागेल, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, काळजीवाहूंचे राजकीय कार्यकर्ते म्हणून बडय़ा पोलीस अधिकार्‍यांना काम करता येणार नाही. असं कोणी करत असतील तर त्यांनी भविष्याचं भान ठेवावं हे आम्ही आजच बजावत आहोत, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या