महाराष्ट्र मुंबई

“कोणी फोडायचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फोडू”

मुंबई |  शिवसेनेचा कोणताही आमदार फुटण्याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भीती नाही, उलट कोणी फोडायचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं आम्ही फोडू, याची त्यांना खात्री आहे, असं मुंबईतील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी म्हटलं आहे.

माझा शिवसैनिक, माझा आमदार फुटेल म्हणून उद्धव ठाकरे यांना कोणतीही भीती नव्हती. त्यांना सर्व आमदारांवर संपूर्ण विश्वास आहे आणि सर्व आमदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे, असं दिलीप लांडे यांनी म्हटलं आहे.

सत्तास्थापनेची संधी मिळाली, की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमदाराला मुंबईत येताना अडचण येऊ नये, सोयीस्कर व्हावं, म्हणून सर्वांना एकत्रितपणे ‘द रिट्रीट’ हॉटेलमध्ये थांबण्याचे उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्याचं दिलीप लांडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या