बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे शिवसेना खासदार भावना गवळी दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

मुंबई | शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. आज त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र आज त्या चौकशीला हजर राहणार नसल्याचं त्यांच्या वकिलांकडून समजलं आहे. त्यांनी चौकशीसाठी ईडीकडून 15 दिवसांची मुदत मागवून घेतली असल्याचंही त्यांच्या वकिलाने सांगितलं आहे.

याआधी त्यांना ईडीने 4 ऑक्टोबरला समन्स बजावलं होतं. त्यावेळी त्यांनी 15 दिवसांची मुदत वाढवून घेतली होती. आता पुन्हा एकदा तब्येतीच्या कारणावरून त्यांनी मुदत मागितली आहे. भावना गवळी यांना चिकनगुणिया झाला असून त्या 13 ऑक्टोबरपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली आहे.

भावना गवळी यांच्यावर बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोप आहेत. याशिवाय त्यांच्यावर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत रुपांतर केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं. मात्र त्या याही वेळी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत.

भावना गवळी यांनी स्वत: त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार केली होती. त्यानंतर ट्रस्टचा संचालक असलेला सईद खान याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ईडने या प्रकरणी कारवाई मजबूत केली असल्याने भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ब्लू फिल्म्स पाहणाऱ्या RSS कडून शिकण्यासारखं काहीच नाही’; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

देशातील नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ, पाहा ताजी आकडेवारी

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More