Top News पुणे महाराष्ट्र

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया; पाटील हे…

पुणे |  मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. पाटलांच्या या इच्छेवर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पदाची आशा बाळगणे हे प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे काम असते. परंतू पाटील कोणत्या सालाबद्दल बोलले आहेत हे त्यांना विचारावं लागेल, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यादरम्यान नाीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटू शकतं. मलाही तसं वाटणं स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“राजकीय हवा बदलली आहे, भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात”

अजिंक्यच्या नावाचा मराठी चित्रपटसृष्टीशी आहे हा जुना संबंध; मधुकर रहाणेंनी सांगितली नावामागची खास बात!

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार

होते शरद पवार म्हणून मुंबईत लँड झालं टीम इंडियाचं विमान, अन्यथा…

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या