मुंबई | अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ करत टीका केली होती. यानंतर आता शिवसेनेकडूनही अमृता फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवरून अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी निलम गोऱ्हे यांनी फडणवीसांना त्यांचं मानसिक स्वास्थ जपा, असा टोला लगावलाय.
निलम गोऱ्हे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “अमृताताई, या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील”अ”मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, मनस्वास्थ चांगले राहते.”
#शिवसेना # एका शब्दाचे महत्व असते.*
*#अमृताशब्दातील अ चे भान महत्वाचे*
अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत,शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही,आपल्या नावातील”अ”मृतावस्थेत जावू देवू नका,मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा २ @fadnavis_amruta pic.twitter.com/ZE74uqEPjH— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 12, 2020
“शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर ‘मृता’ राहील. शिवसेनेची काळजी करु नका, आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे ‘अ’योग्य बरे का”, अशी बोचरी टीकाही निलम गोऱ्हे यांनी केलीये.
महत्वाच्या बातम्या-
अरविंद केजरीवाल वाद लावण्यात पटाईत; प्रमोद सावंत
मला मुख्यमंत्रिपदाचा मोह नाही- नितीश कुमार
..तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?- प्रवीण दरेकर
अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, राज्य सरकारने काढला आदेश
“नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी”