महाराष्ट्र मुंबई

छत्रपतींच्या पुस्तकाचा वाद संपला, जुनी मढी उकरु नका- शिवसेना

मुंबई | ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावरुन राजकीय वर्तुळात संतापजनक वातावरण झालं आहे. या वादावर आता पडदा पडावा आणि वाद संपल्यावर कुणी पुन्हा जुनी मढी उकरुन काढू नयेत ही अपेक्षा, असं म्हणत शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला खडसावलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्यानंतर महाराजांच्या वंशजांनीच याच्यावर बोलावं, अशी  प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली होती. त्यावर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली होती.

शिवसेनेच्या स्थापनेवेळी ‘शिवसेना’ हे नाव ठेवताना शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होत का?, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला होता. त्यावर उदयनराजे यांचं नाव न घेता शिवसेनेनं ‘सामना’तून त्या प्रश्नाची सारवासारव केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी आणि शब्द फिरवणाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे, असं म्हणत शिवसेनेनं उदयनराजेंचं नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या – 

‘त्या’ वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाला फडणवीसांनी सुनावले खडेबोल

…म्हणून आढळरावांचे पीए खासदार अमोल कोल्हेंच्या दरबारी!

“शरद पवारांना ‘जाणता राजा’ कसे म्हणता? हा प्रश्न मोदींनाच विचारा”

महत्वाच्या बातम्या – 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या