Top News महाराष्ट्र मुंबई

“मुंगेरमध्ये हिंदूंचे रक्त सांडले, त्याविरोधात घंटा कधी बडवणार”

मुंबई | बिहारमध्ये मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी झालेल्या पोलीस गोळीबारावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो असं सांगत त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळ्या तरी वाजवा अशी उपहासात्मक टीका केली आहे.

महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असल्याचं अग्रेलखात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र किंवा प. बंगालसारख्या राज्यात असे काही घडले असते तर भाजपवाल्यांनी हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता. राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती, अशी टीकाही भाजपवर शिवसेनेने केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

अखिलेश यादव यांची भेट घेणारे 7 आमदार बसपामधून निलंबित

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या