बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”

मुंबई | राज्यात झपाट्याने वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या सध्या चिंतेचा विषय बनली आहे. राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. वाढती रूग्णसंख्या पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लवण्याचा इशारा दिला. यानंतर भाजपने लॉकडाऊन केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. तसेच फडणवीसांनी देखील कोरोनावर लॉकडाऊन हा पर्यांय नसल्याचं म्हटलं होतं. आता यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस तसेच भाजप नेत्यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

लॉकडाऊन केले तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असं म्हणत शिवसेनेनं भाजप नेत्यांना फटकारलं आहे.

आम्हाला काय कोणाची भीती? कोरोना आम्हाला स्पर्श करणार नाही, या फाजील आत्मविश्वासाच्या मानसिकतेमधून कोरोना वाढत गेला. कोरोनासंदर्भात सबुरीचे सल्ले देणारे या बेफिकिरी मंडळींना दुश्मन वाटू लागतात. देशातील दहा जिल्हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, असं अग्रलेखात म्हटलंय.

राज्यात सर्वाधिक मृत्यू हे नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात कोरोनामुळे 54 रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचे सोडून द्यायला हवे. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवायला पाहिजेत, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…

रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!

“…तर मुंबईत दिवसाला 10 हजार कोरोना रूग्ण आढळतील”

देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख

‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More