Top News महाराष्ट्र मुंबई

“भाजपच्या नटीने मुंबईला ‘पीओके’ म्हटले त्याच भाजपच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या विकासासाठी मुंबईत यावं लागलं”

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईची मायानगरी उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवेसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून योगींना लक्ष्य केलं आहे.

एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

खऱ्या ‘पीओके’ची कायदा-सुव्यवस्था ‘मिर्झापूर’पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

दरम्यान,योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसं असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुपर न्यूमररी पद्धतीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक- खासदार संभाजीराजे

“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही, पवार इज पॉवर”

डाॅ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार!

“महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला”

‘ही’ नावं संपुष्टात येणार; ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या