बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

मुंबई | महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ वगळता काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल, असा सल्ला शिवसेनेनं  सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला दिला आहे.

अहमद पटेल, राजीव सातव यांच्या निधनाने आधीच काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. त्यात त्या पक्षातील काही तरुण नेत्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला हे बरे नाही. काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे, असं शिवसेनेनं म्हटलंय.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतही दारुणरीत्या पराभूत झालेले जितीन प्रसाद हे अखेर भाजपवासी झाले आहेत. प्रसाद हे काँग्रेसचे तरुण नेते. त्यांचे घराणे परंपरागत काँग्रेसचे. हे महाशय मनमोहन मंत्रिमंडळात मंत्री होते. नंतर विधानसभा, लोकसभा हरत राहिले. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांच्या येण्याचा उत्सव भाजपमध्ये साजरा केला जात आहे. यामागे उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित आहे. जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

आतापर्यंत उत्तर प्रदेशात इतर कोणत्याही गणितांची व चेहऱ्यांची गरज भारतीय जनता पक्षाला लागली नव्हती. फक्त नरेंद्र मोदीच सब कुछ हेच धोरण होते. राममंदिर किंवा हिंदुत्वाच्या नावावर मते मिळत होती. आता उत्तर प्रदेशात प्रकृती इतकी खालावली आहे की, जितीन प्रसाद यांच्याकडून ब्राह्मण मतांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता आणि भाजपमध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही, अशी टीका शिवसेनेने केलीये.

थोडक्यात बातम्या- 

“आपल्या मुली पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना फोनपासून दूर ठेवा”

‘…अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल’; सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला इशारा

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिल्याने गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं नक्षली!

‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More