“असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार?”

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) केंद्रीय तपास यंत्रणांसह भाजप (BJP) व भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. आयएनएस विक्रांत गैरव्यवहार प्रकरणावरून शिवसेनेने किरीट सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
विक्रांत युद्धनौकेच्या (INS Vikrant) नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय? माय लॉर्ड तुम्हीच सांगा, अशी खोचक टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. तर विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या या दोघांनी जनतेचा पैसा लुटला असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.
ज्यांच्यावर पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने ज्यांना रोज पोलिस स्टेशनला हजेरी लावायला सांगितली आहे. असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार का?, असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपच्या कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत. येणारा काळ किती कठीण आहे हे लक्षात येईल, अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
थोडक्यात बातम्या-
Raj Thackeray| पुणे दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर
युक्रेनसाठी ‘या’ देशांनी घेतला मोठा निर्णय, उचललं महत्त्वाचं पाऊल
आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं, म्हणाले…
“संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा…”; भाजपचा राऊतांना थेट इशारा
Comments are closed.