बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार?; महाविकास आघाडीकडून मोठा खुलासा

मुंबई | मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाला नाही, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. मंगळवारी विधानसभेत त्यांनी ही माहिती दिली.

शिवस्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत आमदार महेंद्र दळवी, माणिकराव पाटील, हितेंद्र ठाकूर, चंद्रकांत पाटील, सुनिल राऊत, प्रताप सरनाईक आदी सदस्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. यावर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले.

शिवस्मारकाची उंची 212 मीटर अंतिम करण्यात आली आहे. तसेच भरावाचे क्षेत्र 6.80 हेक्टर करण्यात आले आहे. किंमत निश्चित झाल्यानंतर कंत्राटाची किंमत 2 हजार 581 कोटी अधिक वस्तू व सेवा कर अशी निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाले नसल्याचे आढळून आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे  शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांशी पंगा घेणं पडलं महागात? कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

एकमेकांच्या पायात पाय घालणारे सरकार लवकरच पडेल- रावसाहेब दानवे

महत्वाच्या बातम्या-

मराठा आंदोलक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार- फडणवीस

11 नाही तर 15 दिवसांत ठाकरे सरकार पडेल- रामदास आठवले

हिंसाचार करणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घाला; दिल्ली पोलिसांना आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More