बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेकंडहँण्ड कारसाठी आई-बापानं पोटच्या मुलासोबत जे केलं ते ऐकून पोलिसही हादरले!

लखनऊ | कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून एका जोडप्याने जे केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कार खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने एका जोडप्याने स्वतःच्या पोटच्या पोराचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सेकंड हॅण्ड कार खरेदी करण्यासाठी आई-वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दीड लाख रुपयांना विकल्याची माहिती आहे. नवजात मुलाला विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून या जोडप्याने जुनी कारदेखील खरेदी केली होती. यानंतर त्या दोघांनीही आठ दिवस कोणालाही याचा पत्ता लागू दिला नव्हता. मात्र गुरुवारी बाळाच्या आजी-आजोबांनी पोलिसांकडे जाऊन मुलाच्या पालकांविरोधात तक्रार दिली. यानंतर ही घटना उघडकीस आली.

अर्भकाच्या आजी-आजोबांनी स्वतःची मुलगी आणि जावई यांच्यावर हे भयंकर कृत्य केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मुलीने आणि जावयाने कार खरेदी करण्यासाठी मुलाला गुरसैगंज येथील एका व्यावसायिकाला विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे, असं पोलीस निरीक्षक शैलेंद्र कुमार मिश्रांनी सांगितलं.

मूल अद्याप व्यावसायिकाच्या ताब्यात असून आम्ही त्या महिलेला व तिच्या पतीला चौकशीसाठी बोलावलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

कोरोनाच्या भीतीने मदतीसाठी कुणीही आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह हातगाडीवरून स्मशानात नेला

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More