बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! डेल्टा प्लस व्हेरिएंटनंतर आणखी एक व्हेरिएंट आला समोर

नवी दिल्ली | देशात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंट हा कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालेला नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकारामुळे सरकारची चिंता अधिक वाढली आहे. डेल्टा व्हेरिएंटनंतर आता कोरोना व्हायरसमधील नवी प्रजात समोर येत आहे. ही नवी प्रजात अधिक धोकादायक असू शकते, असं म्हटलं जात आहे.

डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कोरोनाचा लॅम्बडा व्हॅरिएंट अधिक धोकादायक आणि जीवघेणा असल्याचा दावा मलेशियाच्या आरोग्य विभागाने केला आहे. आता संशोधकांनाही अशी भीती आहे की, हा नवा व्हायरस अधिक वेगाने पसरू शकतो. पेरू देशात आढळलेल्या लॅम्बडा व्हेरिएंट इतर देशातही आढळत आहे.

आता हा नवा कोरोना व्हायरस व्हेरिएंट जगात 30 देशांमध्ये आढळला आहे. लॅम्बडा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आणि शरीरातील अँटिबॉडीला चकमा देणारा असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हेरिएंटच्या संसर्गावर संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचं काही तज्ज्ञांनी म्हटलं.

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’नं धुमाकूळ घातलेला दिसतोय. यातच आता अजून एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं असं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनीही दिला मंत्रीपदाचा राजीनामा

“शेतकरी उध्वस्त होत आहेत, जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत घरी जाणार नाही”

आज तब्बल एवढे मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; केंद्रीय मंत्र्यांची संख्या जाणार 81 वर 

“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून पळ काढायचा आहे”

खुशखबर! पुण्यात ‘इतक्या’ रुपयांमध्ये करा एसी बसने प्रवास

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More