Top News देश

धक्कादायक! बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या

बिहार | बिहार निवडणूकीचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. मात्र निवडणूकीचा प्रचार सुरु असताना त्याला गालबोट लागल्याचं समोर आलंय.

निवारी बिहारमधील शिवहरमध्ये एका उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामध्ये त्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याचीही हत्या झालीये. हा उमेदवार प्रचाराला निघाला असताना एका हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला.

शिवहर विधानसभा मतदारसंखात जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनारायण सिंह शनिवारी प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. या गोळीबारात श्रीनारायण सिंह यांच्या छातीत गोळी लागली. त्यांना तातडीने रूग्णालयाच नेण्यात आलं मात्र त्यांच्या मृत्यू झाला.

दरम्यान, या हल्लेखोराला उमेदवाराच्या समर्थकांनी घटनास्थळीच पकडलं आणि जबर मारहाण केली. तर या मारहाणीत या हल्लेखोराचाही मृत्यू झालाय.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसेंचं ‘ते’ वक्तव्य पटण्यासारखं नाही- रावसाहेब दानवे

“तंत्रमंत्र आणि जादूटोण्याच्या मदतीने लालूू यादव यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला”

योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- उद्धव ठाकरे

फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा- रोहित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या