बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यवतमाळमधील धक्कदायक प्रकार; दारूची तलफ भागवण्यासाठी केलं असं काही की….

यवतमाळ | सॅनिटायझर प्यायल्यानं 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या वणीमध्ये घडलाी आहे. लॉकडाऊनमुळं दारुची दुकानं बंद असल्यानं, तलफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. या 5 जणांचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याच्या बातमीला वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीही दुजोरा दिला आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी मृतांची नावं आहेत.

वणी शहरातील तेली फैलमधील 47 वर्षीय दत्ता लांजेवार यांनी काल रात्री 9 च्या सुमारास सॅनिटायझर प्यायले. त्यानंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यांना असह्य वेदना होत असल्यानं त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रात्री 11च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

33 वर्षीय नुतन पाथरटकर यांचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला आहे. काल रात्री ते सॅनिटायझर प्यायले आणि नंतर त्रास होऊ लागल्यानं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता तिथून ते घरी निघून आले आणि पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय वणीच्या एकतानगर येथील संतोष मेहरचा सुद्धा सॅनिटायझर पिऊन पहाटे साडेतीन वाजता घरीच मृत्यू झाला. एकतानगरजवळ ढकल ठेला चालवून उदरनिर्वाह करणारा गणेश पाथरटकर याचाही रात्री सॅनिटायझर प्यायल्यानं घरीच मृत्यू झाला आहे. तर सुनील ढेंगळे नावाच्या व्यक्तीनही सॅनिटायझर पिऊन स्वत:चा जीव गमावला आहे.

दरम्यान, 4 मृतदेहांवर नातेवाईकांनी परस्पर अंत्यसंस्कार केले तर 3 मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या 5 जणांनी एकत्र एका ठिकाणी बसून सॅनिटायझर प्राशन केलं होतं का? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

थोडक्यात बातम्या

सुजय विखेंचा गनिमी कावा, स्पेशल विमानानं दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर आणली!

‘आजारातून बरा झाल्यावर एक झाड लाव’; सोशल मीडियावर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल

अनिल देशमुख यांच्यावर धाड, ‘दया कुछ तो गडबड हैं’ म्हणत राऊतांकडून शंकेची वावटळ!

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

आठवड्याभरातच कोरोनामुक्त झाला सोनू सूद, कंगणा म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More