बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस; सर्टीफिकेटमध्ये झाला ‘हा’ घोळ

लखनऊ | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना काळात लसीकरणाबाबत अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहे. अशातच उत्तर प्रदेशातून लसीकरणात घोळ केला असल्याचं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमधील 73 वर्षीय चौधरी रामपाल सिंह यांनी कोरोनाची पहिली आणि दुसरी लस घेतली होती. या लसीकरणाचं सर्टिफिकेट त्यांना भेटलं होतं. मात्र त्यानंतर याच लसीकरणाचं ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ते भेटलं नाही.

चौधरी रामपाल सिंह यांनी सरकारी वेबसाईटवरुन ऑनलाईन सर्टीफिकेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना त्यांच्या नावे एकूण 3 सर्टिफिकेट असल्याचं लक्षात आलं. हे पाहून त्यांनाही धक्का बसला. चौधरी रामपाल सिंह यांना आतापर्यंत चक्क 5 वेळा लसी दिल्या असून सहाव्या लसीची कागदोपत्री तारीखही मिळाली असल्याचं आढळून आलं. लसीकरणात केलेल्या या घोळामुळे आता सगळेच हैराण झाले आहेत.

दरम्यान, एका सर्टिफिकेटमध्ये चौधरी रामपाल सिंह यांना लसीचे दोन डोस देण्यात आले होते. दुसऱ्या सर्टिफिकेटमध्ये एक डोस देण्यात आला होता. तर तिसऱ्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचा एक डोस झाला असून दुसऱ्या डोसची तारीख देण्यात आली होती. तांत्रिक चुकांमुळे हा प्रकार घडला असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं.

थोडक्यात बातम्या – 

विराट कोहलीने घेतला आणखी एक मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का

खळबळजनक! भाजपच्या माजी मंत्र्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या

दुसऱ्या सत्रात चेन्नईची धमाकेदार सुरूवात; मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची बिग बॅासच्या घरात एन्ट्री

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More