बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! संजय राऊतांच्या घरी कोरोनाचा शिरकाव, चार जणांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं सगळीकडे हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्येमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी एकूण चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या घरातील आई, मुलगी, पत्नी आणि पुतणी कोरोना पाॅझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

आतापर्यंत राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनानंही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. निर्बंधांमध्येही सक्ती केल्याचं पहायला मिळत आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कोरोना (Corona) महामारीनं राज्यात धुमाकूळ घातला आहे. यातच कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरियंटनं (Omiron) चिंतेत भर पाडली आहे. दिवसेंदिवस राज्यात रुग्णांची संख्या वाढत असून निर्बंध कडक केले जात आहेत. या कोरोना महामारीनं राजकीय नेत्यांनाही सोडलेलं नाही.

थोडक्यात बातम्या – 

पुढील चार दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागात अलर्ट जारी

मोठी बातमी! राज्यातील सर्व महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद!

‘या’ कारणामुळे सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर करण्यात आला दफनविधी!

‘मला हात लावायचा नाय’; आघाडी सरकारमधील आजी-माजी आमदारांची जुंपली

‘मी कधीच बेसावध नसतो’; भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More