बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

मुंबई | राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालवला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आल्याने संपुर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या उपहारगृहातील राजपात्रित अधिकाऱ्यांच्या एका खोलीत दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे.

मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस बाटल्यांचा ढिगारा बघायला मिळाला आहे. मंत्रालयाचा सगळा भाग सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली असूनसुद्धा या बाटल्या आत आल्या कुठुन आणि त्या कोणी मागवल्या आहेत. त्याचा अजूनही तपास लागलेला नाही.

सामान्य लोकांना मंत्रालयात सहज प्रवेश दिला जात नाही. कामानिमित्त लोकांना मंत्रालयात प्रवेश करायचा असल्यास तेथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची कडक बंदोबस्तात चौकशी केली जाते. अशातच दारूच्या बाटल्या सापडल्याने मंत्रालयाच्या या भोंगळ कारभारावर सगळ्या स्तरातून टीका होत आहे. तर मंत्रालयाची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा?, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था ही पोलीस प्रशासनाच्या अधिकारात येते. परंतु मंत्रालयात फक्त गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय येत नाही तर इथे सर्व मंत्री आणि सगळ्या विभागांचा समावेश असल्याचं भरणे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

धक्कादायक! आता कोरोनापेक्षाही धोकादायक ‘या’ विषाणूचा शिरकाव

सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, उमेदवारांचं गुन्हेगारी रेकाॅर्ड प्रसिध्द करण्याचा अवधी अवघा…

सुखद धक्का! नीरज चोप्राच्या सन्मानार्थ घेण्यात आला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

भाजपकडे ‘इतक्या’ हजार कोटींचं उत्पन्न; एका वर्षात तब्बल 50 टक्क्यांची वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More