बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनापासून वाचण्याचा उपाय सांगत त्यानं खाल्ला साप अन्…..

चेन्नई | देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्यव्यवस्था डगमगताना दिसत आहे. अशातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करावं हे सांगणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही मजेशीर व्हिडीओ पहायला मिळतात. तर काही अंगावर काटा आणणारे व्हिडीओ असतात.

अशाच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एका व्हिडीओमधून व्यक्ती सापाला खाताना दिसतो आहे. साप हा कोरोनावर अँटिडोट म्हणून उत्तम आहे, असा दावा त्यानं केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

तामिळनाडूच्या मदुराईतील ही धक्कादायक घटना आहे. या व्यक्तीचं वय 50 असून त्यांचं नाव वाडिवेल असल्याचं सांगितलं जातं आहे. वाडिवेल नावाच्या या व्यक्तीनं शेतामधून एक साप पकडला होता. सापाला मारलं आणि कोरोनावरील उपचार असल्याचं सांगत तो कच्चा खाला. त्यावेळी त्याच्या मित्राने व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.

दरम्यान, कोरोनासंदर्भात असा विचित्र सल्ला देणं त्या व्यक्तिला चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन 7,500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

थोडक्यात बातम्या – 

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! मुंबईतील नवी कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या आत; कोरोनामुक्तीचा दर 94 टक्यांवर

काय सांगता! प्रियंकाच्या या संपुर्ण अवताराची रक्कम ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता; आता शनिवार-रविवारीही दुकानं राहणार सुरू

…तर कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल- संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More