बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील अंत्यसंस्काराला तोबा गर्दी, मृताचे पाय धुवून पाणी पिल्यानं एकच खळबळ

पुणे | वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनानं नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, सगळे नियम मोडित काढत नागरिक मनमानी करतांना दिसत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळं अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असं असतानाही लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. इतकंच नाही तर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारादरम्यान मृतदेहाचे पाय धुवून पाणी प्यायल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचही पोलिसांनी सांगितलं आहे.

मृत व्यक्तीला घरातील महिलांनी शेवटची आंघोळ घातली आणि ते पाणी प्यायल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वीची असून सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता. तर त्यांच्या घरातील इतरांनाही अद्याप तरी कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे पोलिसांनी फक्त अंत्यसंस्कारासाठी अनावश्यक गर्दी जमा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सांगण्यात आली आहे.

दरम्यान,  पुणे जिल्ह्यात कोरोनाने रौद्ररुप धारण केलं आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, काही नागरिक अजूनही बेजबादार कृत्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. अशातच लोणी काळभोरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, देवासारखे धावून आले मात्र त्यांना हिरावून नेले!

बाप नाही हैवान… मुलीसोबत जे कृत्य केलं त्यानं सारं यवतमाळ हादरलं

आयपीएलमध्ये कुणालाही जमलं नाही ते महेंद्रसिंग धोनीनं करुन दाखवलं!

मुळशी पॅटर्नची नागपुरात पुनरावृत्ती; भर रस्त्यावर ‘लेडी डॉन’ची पळूपळून हत्या

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More